कर्जत (रायगड) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. ‘1999 मध्ये केंद्रात आणि राज्यात सहभागी होण्याची ऑफर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली होती.’ असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
‘शरद पवारांना एनडीएमध्ये जाण्याची ऑफर होती. पण तत्वांशी तडजोड न करता पवार साहेबांनी त्यांना नकार दिला. जर त्यावेळी ऑफर स्वीकारली असती तर शरद पवार यांना NDA सरकारमध्ये क्रमांक दोनच पद मिळालं असतं.’ असंही ते यावेळी म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळीक असल्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजप यांचा राजकीय विचार वेगळा आहे हे पटवण्यासाठी 1999च्या ऑफरच उल्लेख प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात केला. ते रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील चिंतन बैठकीत बोलत होते.
दरम्यान, याच भाषणात पटेलांनी शरद पवार 2019 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्यही केलं.
‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्यात आमच्या मनात पवार साहेबांच्याबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही. ते घडू शकतं.’ असंही यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले.
‘पवार साहेब तुम्ही सॉफ्ट राहणं सोडून द्या’
दरम्यान, यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांनी देखील काही सल्ले दिले. ‘पवार साहेब तुम्ही सॉफ्ट राहणं सोडून द्या. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जे बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल पवार साहेब तुम्ही खूप सॉफ्ट राहता.’ असं म्हणत पटेल यांनी पवारांनी आक्रमक भूमिका घ्यावी असंही सुचवलं.
‘काँग्रेसबरोबर आपलं शत्रुत्व नाही’
‘देशाच्या राजकारणात जे वातावरण तयार झालेलं आहे ते पाहता आपल्याला खुल्या मनाने काम करावं लागेल. काँग्रेसबरोबर आपलं शत्रुत्व नाही सध्या हे संबंध ‘कभी खुशी, कभी गम’ आहेत. 2014 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर 125 ते 140 जागांवर विजय मिळाला असता. विधान सभा-लोकसभा निवडणूक एकत्र येऊ शकतात,पक्षाचा ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे. असं शरद पवार यांना वाटतं.’ असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी 2019च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासून आघाडीचे संकेत दिले असले तरी आता ऐनवेळी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
2019ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, पटेलांचं अप्रत्यक्ष वक्तव्य
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तेव्हा अटल बिहारींकडून पवारांना ऑफर होती, प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2017 03:45 PM (IST)
‘1999 मध्ये केंद्रात आणि राज्यात सहभागी होण्याची ऑफर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली होती.’ असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -