(Source: ECI | ABP NEWS)
Baramati Diwali : यावर्षी पवार कुटुंब बारामतीत दिवाळी साजरी करणार नाही, नेमकं कारण काय?
दरवर्षी मोठ्या उत्साहात पवार कुटुंब बारामतीत दिवाळी (Baramati Diwali) सण साजरा करत असते. पण यावर्षी बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांकडे दिवाळी पाडवा साजरा होणार नाही.
Baramati Diwali News : दरवर्षी मोठ्या उत्साहात पवार कुटुंब बारामतीत दिवाळी (Baramati Diwali) सण साजरा करत असते. या सणाच्या दिवशी पवार कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र येत असतात. पण यावर्षी बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांकडे दिवाळी पाडवा साजरा होणार नाही. कारण, या वर्षी शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांच्या पत्नी भारती प्रतापराव पवार (Bharati Pawar) यांचं निधन झालं आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबीयांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळी पाडव्याला पवारांना भेटण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येतात
बारामतीत दरवर्षी पवारांचा दिवाळी पाडवा हा मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. या पाडव्याचं कुतूहल राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातील पवार प्रेमींमध्ये असते. या पाडव्याला पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातून विविध राजकीय पक्षातील आमदार, खासदार यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक बारामतीकडे पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र यंदाचा पाडवा होणार की नाही? याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी साशंकता व्यक्त केली होती. अशातच दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे.
मागील वर्षी शरद पवारांचा दिवाळी पाडवा गोविंद बागेत तर अजित पवारांचा काटेवाडीत झाला होता
दरवर्षी बारामतीच्या गोविंद बागेत पवारांचा दिवाळी पाडवा संपन्न होत असतो. मात्र, गेल्या वर्षीचा दिवाळी पाडवा हा राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय झाला होता. कारण पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर पवारांच्या पाडव्यामध्येही फूट पडल्याचा पाहायला मिळालं होतं. शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा झाला. त्यामुळं नात्यानंतर सणातही फूट पडल्याचे दिसून आले होते. शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आले होते. तर अजित पवारांना भेटण्यासाठी देखील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अजित पवार त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला होता.
महत्वाच्या बातम्या:
Shani Vakri 2025 : यंदाच्या दिवाळीला जुळून येतोय दुर्लभ शनि योग; 4 राशींवर होणार धनसंपत्तीचा वर्षाव, शनि करणार मालामाल

























