Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाची सुधारित आवृत्तीचे प्रकाशन 2 मे रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. या पुस्तकात देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या बदलांचा समावेश करण्यात आला आहे. महाविकास आघाडीची निर्मिती या वर्तमान काळातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीवर भाष्य लोक माझा सांगातीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
महाराष्ट्रात 2019 पासून अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. या सर्व उलथापालथी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दुरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. या सर्व घटनांचे साक्षीदार स्वत: शरद पवार असल्याने पुस्तकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या भागाचे 2 मे रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता पुस्तक पुर्नप्रकाशन सोहळा होणार आहे. त्यामुळे 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर तसेच महाविकास आघाडीच्या जन्माची पटकथा उलघडणार का? याची उत्सुकता आहे.
शरद पवार काय म्हणतात?
शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे, पण 2019 नंतर चित्र बदलले. शिवसेनेने 2019 मध्ये 124 जागा लढवल्या. भाजपने 164 जागा घेतल्या. स्वत:च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझे उतरवून ठेवायचे असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार, पण भाजपमध्ये विलीन करून घेत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केले. राज्यातील 50 मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान होतं. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले दंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते.
शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करण्यात येणार नाही असा सरळ राजकीय हिशोब भाजपचा होता. यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे, याविषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यात तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही, पण आग धुमसत होती, असे पुस्तकात म्हटले आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती नसल्याचं ध्वनित होत होतं, असेही म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची भाजपच्या नेत्यांकडून मातोश्रीवर येऊन संवाद घडवावा हीच अपेक्षा कायम होती, असेही म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या