(Source: ECI | ABP NEWS)
ठाकरे गटाचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, कसलाही मोर्चा काढू देत परिणाम होणार नाही, शंभूराज देसाईंचा हल्लाबोल
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई ( Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चाचा आणि ठाकरे ब्रँड वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे.
Shambhuraj Desai : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई ( Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चाचा आणि ठाकरे ब्रँड वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे. कसलाही मोर्चा काढू देत, जनमानसावर काही परिणाम होणार नाही. उबाठा गटाकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका शंभूराज देसाई यांनी केली. तर बाळासाहेब ठाकरे हे एकच ठाकरे ब्रँड आहे असे देसाई म्हणाले.
मदत देणारे कोण आहेत? आणि मोर्चे काढणारे कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित
उद्धव ठाकरे यांच्या काळात शेतकऱ्यांना जेवढी मदत दिली गेली, त्यापेक्षा जादा मदत आमच्या सरकारने दिली आहे. त्यामुळं त्यांनी हंबरडा मोर्चा काढून दे. नाहीतर आणखीन कसलाही मोर्चा काढू दे. केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उबाठा गटाचा चालू आहे. याचा जनमानसावर काही परिणाम होणार नाही. मदत देणारे कोण आहेत? आणि मोर्चे काढणारे कोण आहेत हे महाराष्ट्राची जनता जाणून असल्याचे देसाई म्हणाले.
कराड, पाटण तालुका अतिवृष्टी समावेश
साताऱ्यातील कराड आणि पाटण तालुक्यात गेल्या चार ते पाच महिन्यापासून सलग पाऊस पडल्याने 70 टक्के पेरण्या झाल्या नाहीत. तर ज्या पेरण्या झाल्या त्या ठिकाणचे उत्पादन अत्यल्प आहे. यावर प्रत्यक्षस्थळ पाहणी होणार असून कोणताही महाराष्ट्रातील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आत्तापर्यंत ठाकरे ब्रँड नव्हता का? असा उलट सवाल करत देसाई यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅन्ड एकच आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँन्ड आहे. तो ब्रँन्ड काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. त्या नावाखाली जे कोणी गर्दीत दुंन्डा पैसा चालवायच काम करतायत, त्यांचा पैसा चालणार नाही.
शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर मध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील मोर्चात सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महत्वाच्या बातम्या:
























