Shahapur Accident News : मुंबई नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरुन एक वॅगनार कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेनंतर शहापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास शहापूर पोलीस करत आहेत. 

नेमका कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात (Accident) 1) मयुरेश विनोद चौधरी वय 29 रा. तानसा  2) जयेश किसन शेंडे वय 25  रा. उंबरखाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर हर्षल पांडूरंग जाधव वय 29 रा. पेंढरघोळ हा गंभीर जखमी असून  उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात ऐवढा भयानक झाला आहे की कार ने रस्त्याच्या कडेला असलेल्या सरक्षित भिंतीच्या कठड्याला  जोरदार धडक देऊन 40 ते 50 फूट लांब जाऊन डिव्हायडरवर आदळली. यामुळं कारच्या पुढील दोन्ही एअरबॅक ओपन झाल्या आणि कार मधील प्रवाश्यांना जब्बर मार लागल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहेत. सध्या या संपूर्ण घटनेचा तपास शहापूर पोलीस करीत आहे. 

गेल्या चार दिवसाखालीच मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात भीषण अपघात

गेल्या चार दिवसाखालीच मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात कोणीही जखमी नसले तरीही वाहतुक कोंडी झाल्याने कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला. माजिवडा येथील फ्लाॅवर व्हॅली परिसरातून बुधवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास एक व्हॅन ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करत होती. त्याचवेळी एका कंटेनरने त्या व्हॅनला धडक दिली. त्यामुळे व्हॅन विरुद्ध दिशेकडील वाहिनीवर जाऊन ठाणे महापालिकेच्या घंटागाडीला धडकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वाहतुक पोलीस कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी दाखल झाले. एक हायड्रा मशीन आणि टोविंग व्हॅन मशीन ही यंत्रणा आल्यानंतर येथील अपघातग्रस्त वाहने रस्त्यामधून बाजूला करण्यास सुरुवात झाली.

महत्वाच्या बातम्या:

Dharashiv Accident: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू