यवतमाळमध्ये 7 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2017 03:00 PM (IST)
संदीप शेळके असं हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. संदीप हा आदिवासी निवासी आश्रमशाळेमध्ये पहिल्या वर्गात शिकत होता.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या ढाणकी गावामध्ये आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका 7 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. संदीप शेळके असं हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. संदीप हा आदिवासी निवासी आश्रमशाळेमध्ये पहिल्या वर्गात शिकत होता. कालपासून तो आश्रमशाळेतून बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरु होता. मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनं आश्रमशाळेच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांचा याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.