Sangli News: सांगली जिल्ह्यातील करगणी (ता. आटपाडी ) येथील अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचे तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक फरार आहे.
महिला आयोगाकडून दखल
दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. महिला आयोगाने ट्विट करत म्हटलं आहे की, सांगलीच्या आटपाडीमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीने शारीरिक,मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याबाबत पॉक्सोसह भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 पैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौथ्या आरोपीवर उपचार सुरू असून त्यानंतर त्याला पोलिस ताब्यात घेतील. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक, सांगली यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या प्रकरणात मृत पीडित मुलीला दिलेल्या त्रासाची सखोल चौकशी व्हावी. तसेच आरोपींनी अजून काही मुलींना त्रास दिला आहे का? या दृष्टीने संवेदनशीलतेने तपास व्हावा असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी 7 जुलै रोजी सकाळी करगणी ता.आटपाडी येथील राहत्या घरामध्ये रस्सीच्या सहाय्याने लोखंडी अंगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मुलगी साहिलीने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी जेवत असताना गावातील राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात, व बनपुरी येथील अनिल काळे हे शाळेला जात असताना त्रास देतात व त्यांनी माझा लैंगिक छळ केला आहे त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. याबाबत तिला सकाळी बघू असे सांगितले. ती व तिची बहीण झोपी गेल्या होत्या. सकाळी लवकर लहान मुलीने साहिलीने गळफास घेतल्याचे सांगितले.
आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
मुलगी साहिलीला मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात सर्व रा.करगणी व अनिल नाना काळे (रा.बनपुरी) यांनी मुलीचा लैगिंक छळ करून आत्महत्यास प्रवृत्त केले आहे. या घटनेत बेकरी चालक असणाऱ्या राजू गेंड हा युवक मुख्य सूत्रधार असून बेकरीच्या आडून त्याने अनेक मुली व महिला यांचे लैंगिक शोषण केल्याच्या चर्चा आहे. बेकरीच्या आत असणारी एक खोली व बेकरी शेजारी असणाऱ्या आयसीआयसी बँकेच्या वरच्या मजल्यावर एक खोली भाड्याने घेतली येथून यांचे रॅकेट सुरू होते. करगणी बस स्थानक हे याच बेकरीच्या समोर असून येथे अनेक महिला शाळकरी मुली थांबलेल्या असतात. समोरच बेकरी असल्याने एसटी बसची वाट पाहत असताना मिळालेल्या दहा-पंधरा मिनिटांच्या अवधीमध्ये बेकरीतून काही साहित्य खरेदी करण्याच्या निमित्ताने गेलेल्या मुली महिला यांच्यासोबत ओळखीचे रूपांतर प्रेमात करून त्यांना आपल्या बाहुपाशात ओढण्याचे काम हे नराधाम करत होते.
आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक चित्रीकरण केलेले व्हिडीओ
दरम्यान आरोपी यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिला व मुलींच्या सोबत केलेल्या अत्याचाराच्या अत्याचाराचे व्हिडिओ मिळाले असून यामध्ये अनेक महिला व मुलींना बळजबरी केल्याचे निष्पन्न झाल्याचे चर्चा सुरू आहे. दरम्यान करगणीतील बेकरी चालक व त्यामध्ये काम करत असणारे मुलं व त्याचे मित्र यांनी अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे व्हिडिओ चित्रीकरण करत तिला तिचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्या प्रवृत्त केल्याबद्दल मंगळवारी संपूर्ण करगणी गावांमध्ये सर्व दुकाने व व्यवहार बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत मंगळवारी दिवसभर करगणी गावातील ग्रामस्थांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला होता.
इतर महत्वाच्या बातम्या