करमाळ्यात मुख्याध्यापकानेच मुलीला पळवलं, पोलिसात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2018 03:37 PM (IST)
काही दिवसांपूर्वी याच शाळेतील शिपायाने देखील एका मुलीला पळवून नेण्याची घटना घडल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी शाळा बंद करण्याची मागणी केली आहे.
सोलापूर : गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील बोरगाव येथे चालणाऱ्या एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या मुख्याध्यापकाच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पद्धतीने गावातील वातावरण कलुषित होऊ लागल्यावर आता ग्रामस्थांनी प्रहार संघटनेच्या मदतीने या शाळेसमोर आंदोलन सुरु केलं आहे. सध्या शाळेला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. पोलीस या शाळेच्या शिक्षकाला सध्या शोधत असून अजून या शिक्षक आणि विद्यार्थिनीचा कोणताही तपास लागलेला नाही. काही दिवसांपूर्वी याच शाळेतील शिपायाने देखील एका मुलीला पळवून नेण्याची घटना घडल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यामुळे ही शाळा बंद करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.