Satara ZP Election Result :   राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कराड पंचायत समिती निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे दिनेश कुंभार हे एका मताने विजयी झाले आहेत. फेर मतमोजणीत कुंभार विजयी झाले आहेत.  

Continues below advertisement

कराड तालुक्यात तांबवे पंचायत समिती गणासाठी फेर मतमोजणी

कराड तालुक्यात तांबवे पंचायत समिती गणासाठी फेर मतमोजणीत पार पडली. यामध्ये शिवसेनेचे दिनेश कुंभार एका मतांनी विजयी झाले आहेत. एका मताचा फरक असल्याने शिवसेना आणि भाजपने फेर मतमोजणी अर्ज केला होता. शिवसेना आणि भाजप अटीतटीची लढत झाली त्यामध्ये शिवसेनेने बाजी मारली. याठिकाणी पोस्टल मते पुन्हा मोजण्यात आली. शिवसेना उमेदवार दिनेश कुंभार यांना 5 हजार 286 तर भाजप उमेदवार तानाजी देवकर यांना 5 हजार 285 मते पडली. 

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणनातून ठाकरे गटाचे अमर समुद्रे हे देखील एका मताने विजयी

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणनातून ठाकरे गटाचे अमर समुद्रे हे अवघ्या एक मतांनी विजयी झाले आहेत. अमर समुद्रे यांना 3187 मते तर भाजपाचे निहाल काझी यांना 3186 मते मिळाली आहेत. मात्र, अमर समुद्रे विजयी झाल्यानंतर फेर मतमोजणी करण्यात आली,  त्यातही अमर समुद्रे विजय असल्याचे स्पष्ट झाले. यामुळं सकाळी लागलेला निकाल राजकीय दबावातून रात्रीपर्यंत लांबवल्याचा आरोप समुद्रे यांनी केला आहे. 

Continues below advertisement

एका मताचे महत्त्व शब्दात सांगूच शकत नाही 

मतमोजणी केंद्रावर वकिलांना बोलवावं लागलं, वकिलांनी युक्तिवादानंतर एक मताने विजय झाल्याचं जाहीर केलं आहे. राज्यातील एकमेव रात्री उशिरा पर्यंत लांबलेला निकाल अखेर अधिकृत जाहीर झाला आहे. रात्री आठ वाजता अमर समुद्रे यांच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्रासमोर जल्लोष केला. एका मताचे महत्त्व शब्दात सांगूच शकत नाही अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार समुद्रे यांनी दिली आहे. 

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांपैकी 27 जिल्हा परिषद गटात भाजपनं  विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला तर इतरांनी 2 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांमुळं साताऱ्यात त्रिशंकू चित्र निर्माण झालं आहे. साताऱ्याच्या सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे गेल्या आहेत.     

महत्वाच्या बातम्या:

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?