Satara News Update : "कोण संजय राऊत हे मला माहित नाही. कोणाबद्दल आम्ही वाईट बोलत नाही. परंतु, आमच्याबद्दल कोणी वाईट बोललं तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन, असा इशारा उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलाय.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टवर त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नव्हती. मात्र, आज साताऱ्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षीस देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.
"संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन. स्वाभिमानाला छेडचाल तर मी गप्प बसणार नाही, त्यांना बघायला वेळ लागणार नाही, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला.
"कोणत्याही कुटुंबातील असला तरी त्याला स्वाभिमान असतो, स्वाभिमान छेडला तर बाकिचे गप्प बसतील. मात्र, मी गप्प बसणार नाही. पुढची भूमिका बोलून दाखवत नाही. लोक बघतील काय करायचे ते, किती वेळ लागतो, असे खूप बघितले आहेत. आम्ही सर्वांचा मान सन्मान करतो, त्यांना कोणी अधिकार दिला आमचा अपमान करायचा? असा प्रश्न उदयराजे भोसले यांनी यावेळी उस्थित केला.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला उदयनराजे भोसले यांनी बक्षीस म्हणून बुलेट देण्याची घोषणा केली होती. आज सातारा येथे उदयनराजे यांच्या जलमंदिर या निवासस्थानी या बक्षिस वितरणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी उदयनराजे यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील याला बुलेट गाडी बक्षिस म्हणू देण्यात आली. पृथ्वीराज पाटील याला जी बुलेट उदयनराजेंकडून देण्यात आली त्या बुलेटला उदयनराजे यांचा खास 007 हा नंबरही देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या