Shivendrasinhraje Bhosale :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळींनी गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. सातारा जिल्ह्यात देखील हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale)  यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही पालकमंत्र्यांना कधीच कमी लेखलं नाही. माझं पालकमंत्री यांना एवढेच म्हणणं आहे की सातारा जिल्ह्यात युतीबाबत जसा निर्णय पाटणमध्ये होईल तसाच निर्णय मेढ्यामध्ये होईल, असा टोला  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांनी मंत्री शंभूराज देसाईंना (Shambhuraj Desai) लगावला. एका जाहीर कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची जोरदार फटकेबाजी केली. 

Continues below advertisement

काल नेमकं काय म्हणाले होते शंभूराज देसाई?

काल शंभूराज देसाई यांनी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, मात्र भाजपकडून अद्याप कोणताही निमंत्रण आलेले नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आमची तयारी सुरु आहे. आमचा युती करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप जागांच्या बाबत चर्चा झालेली नाही असेही शंभूराज देसाई म्हणाले. सातारा जिल्ह्याती युती करण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याची माहिती देखील शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्यावर आज मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत जसा निर्णय पाटणमध्ये होईल तसाच निर्णय मेढ्यामध्ये होईल, असा टोला  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांनी मंत्री शंभूराज देसाईंना लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळं सर्वत्र आता युती होईल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मतदारसंघातील मेढा या गावांमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेळावा घेऊन युतीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत जाहीर सभेत बोलले होते. या टीकेला उत्तर देत असताना शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शंभूराजे देसाई यांच्यावर जाहीर भाषणातून जोरदार टोलेबाजी केली आहे. जसा निर्णय आपल्या पाटण विधानसभा मतदार संघात होईल तसाच निर्णय मेढ्यामध्ये होईल असे ते म्हणाले.  

पाटण मतदारसंघांमध्ये महायुती म्हणून घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा

पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय करावा आणि मग आम्हाला सांगावं की महायुती आहे आणि त्याप्रमाणे वागा असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. कारण ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मी आत्ता मंत्री झालो आहे. माझ्या आधीचे मंत्री झाले आहेत. त्यामुळं आम्ही त्यांचं अनुकरणच करत आहोत. मंत्री म्हणून कसं काम करायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकत आहोत असा टोला देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला. वयाने सुद्धा ते मोठे आहेत. त्यांनी त्यांच्या पाटण मतदारसंघांमध्ये महायुती म्हणून घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा त्याचाच अनुकरण आम्ही आमच्या मतदारसंघातील मेढा येथे करु असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण भाजपकडून कोणतही निमंत्रण नाही, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले शंभूराज देसाई?