Satara Nachani News : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कुसुंबी हे गाव 'नाचणीचे गाव' म्हणून राज्यासह देशभरात ओळखले जाऊ लागले असून या गावच्या नाचणीचे खमंग पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत. या गावात यंदा नाचणीची विक्रमी लागवड झाली असून 700 हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात आता नाचणीच्या विक्रमी लागवडीमुळे कुसुंबीला नाचणीचे गाव म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 

Continues below advertisement


नाचणीच्या शेतीतून महिला कमवतात लाखो रुपये 


साताऱ्याच्या कुसुंबीच्या नाचणीचा खमंग स्वाद सातासमुद्रापार आहे. तब्बल 400 महिला नाचणीची शेती करत आहेत. या गावाने नाचणीचे गाव म्हणून देशभरात नवी ओळख निर्माण केली आहे. 700 हेक्टरवर लागवड केली असून, या सर्व महिला नाचणीच्या शेतीतून लाखो रुपये मिळवत आहेत. नाचणीच्या माध्यमातून 15 प्रकारचे विविध खाद्य पदार्थांचे प्रॉडक्ट निर्मिती  केली जाते. हे पदार्थ राज्यसह देशभरात विक्रीसाठी कुसुंबीकर पाठवतात. 


नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक मागणीप्रमाणे बनवून दिले जातात


दरवर्षी दिवाळीला देखील दिवाळी फराळ अमेरिकेला पाठवला जातो. नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक मागणीप्रमाणे बनवून दिले जात आहेत. नाचणीसारख्या पोषक अन्नधान्याची वाढती मागणीमुळं कुसुंबी गावातील 232 महिला या स्वावलंबी झाल्या आहेत. या महिलांनी थेट गावामध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याची कंपनी सुरू केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा नफा त्या कमवत आहेत. 


मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरड धान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि पारंपरिक दृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते आणि आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. 


नाचणी हे गवतवर्गीय कुळातील (Poaceae) महत्वाचे पीक


नाचणी हे गवतवर्गीय कुळातील (Poaceae) महत्वाचे पीक आहे. त्यामुळे या पिकाची वाढ होताना मुख्य खोडासोबत फुटवे येण्याचा गुणधर्म आहे. या धान्याचा आकार लहान असून आकार हे एकदलवर्गीय पीक आहे. या पिकामध्ये स्वपरागीभवन प्रक्रियेदवारे बीज निर्मिती होते. सर्वच भरड धान्य पीके ही बदलत्या हवामानास अनुकूल पिके आहेत. या पिकांमध्ये सी4 पद्धतीने प्रकाश संश्लेषण (मका, ऊस, ज्वारी) होते. त्यामुळे पानाद्वारे अन्ननिर्मिती करताना प्रकाश, पाणी व कार्बन डायऑक्साइडचा सुयोग्य वापर या वनस्पतीमध्ये केला जातो. तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ठ वैशिष्ट्ये जसे की, कमी ऊंची, पानांचा लहान आकार, कणिस व पाने यामध्ये अन्नपदार्थ पुरविण्यासाठी योग्य पद्धत, तंतूमय मुळांची खोल वाढ व प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म यामुळे या पिकांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे.


महत्वाच्या बातम्या:


Konkan Rain : कोकणात 90 टक्के क्षेत्रावर भात आणि नाचणीची लावणी पूर्ण, यावर्षी लागवडीत वाढ