Shamburaj Desai : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपालिकेच्या निवडणुकंमध्ये शिवसैनिकांचा कुठेही अपमान सहन केला जाणार नाही. शिवसेनेला कुठेही कमी लेखले जाईल असे निदर्शनास आले तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. महायुती म्हणून नक्कीच इतरही दोन पक्षाचा सन्मान केला जाईल. मात्र ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेला व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला तर ते सहन केले जाणार नसल्याचा गंभीर इशारा देसाई यांनी दिला आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. 31 जानेवारी 2026 च्या आधी निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. 

Continues below advertisement

कार्यकर्त्यांना दिली जाणारी अपमान जनक वागणुकीबाबत शंभूराज देसाई आक्रमक

सातारा जिल्ह्यातल्या महायुतीच्या लोकप्रतिनिधींना राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी इशारा दिला आहे. महायुतीमध्येच शंभूराज देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली जाणारी अपमान जनक वागणुकीबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी काळात पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्ष्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांनी दौरे सुरु करुन चाचपणी देखील सुरु केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग देखील बांदलं आहे. याच पार्श्भूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होणार की स्वंत्र लडणार हे पाहणं देखील महत्वाचं ठारणार आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी केलेलं वक्तव्य यमहत्वाचं मानलं जात आहे. 

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण!  फलटण शहरात एसआयटीचे अधिकारी दाखल 

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केलेली आहे. या एसआयटीच्या प्रमुख अधिकारी आयपीएस तेजस्विनी सातपुते या फलटणमध्ये स्वतः दाखल झाल्या आहेत.  त्या स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत असे शंभूराज देसाई म्हणाले. या प्रकरणांमध्ये जे जे कोणी दोष असतील ते प्रत्येक घटना प्रत्येक व्यक्तीची या संदर्भातली असणारी तपासणी केली जाईल. त्यामुळं कोणाचीही गय केली जाणार नाही असा खुलासा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.  

Continues below advertisement