Satara : नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच साताऱ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आणि मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. मुंबईत आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्यासोबत मनोहर शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे मनोहर शिंदे काँग्रेसचे साथ सोडणार?
काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे मनोहर शिंदे काँग्रेसचे साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पुढील दोन दिवसात पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील एकमेव मलकापूर नगरपरिषद काँग्रेसकडे होती.
महत्वाच्या बातम्या: