Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकरणार नाही, अशी भूमिका भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी घेतली आहे. धाराशिव येथील कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारल्याचे पाहायला मिळाले. मंत्री जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांची धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती आणि भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात सुरेश धस बोलत होते. यावेळी भाजप आमदार सुरेश धस हे कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र त्यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला.

Continues below advertisement


सुरेश धस यांनी 22 फेब्रुवारीला घेतली होती संतोष देशमुख कुटुंबियांची भेट 


दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी 22 फेब्रुवारीला मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख  कुटुंबियांची भेट घेतली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात जोरदार राळ उडवून दिली. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याच धनंजय मुंडेंची दोन वेळा भेट घेतल्याचं उघड झाल्यावर सुरेश धस प्रचंड टीकेचे धनीही झाले होते. 


9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुखांची झाली होती हत्या


बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डोणगावच्या टोलनाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून संतोष देशमुख यांच्या गाडीला अडवण्यात आलं होतं. त्या गाडीतून 5 ते 6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करु लागले. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले. त्यानंतर देशमुखांची आरोपींनी हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन राजकी वातावरण चांगलच तापलं आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलच लावून धरलं आहे. 


 



महत्वाच्या बातम्या:


अजित पवारांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत महायुती सरकारमधील मंत्र्याचं स्पष्ट मत