Santosh Deshmukh murder case : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन (Santosh Deshmukh murder case) वातावरण चांगलच तापलं आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आता परभणीत देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. आज परभणीत सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेतला आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 4 जानेवारीला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 


 4 जानेवारी रोजी परभणीत मुक मोर्चाचं आयोजन


सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी परभणीत मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीनं बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला मोठ्या संख्येनं सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. 4 जानेवारी रोजी परभणीत मुक मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. नूतन मैदान येथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे. या मोर्चाला संतोष देशमुख यांची मुलगी आणि भाऊ उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतर आता परभणीतही मोर्चा काढण्यात येणार आहे. 4 जानेवारीला शहरातील नूतन मैदान मैदानापासून हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. 


संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप


संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. अनेक दिवस उलटून देखील देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये काल (दि.28) सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक आणि मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर आता परभणीत देखील भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. विरोधकांकडून सातत्यानं या प्रकरणातील आरोपींना अटक करुन कठोऱ शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे. काल बीडमध्ये मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते.