बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) यांची मुलगी वैभवी देशमुखचा ( Vaibhavi Deshmukh) नीट (NEET) परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. वैभवीला नीटच्या परीक्षेत 147 गुण मिळाले आहेत. याबाबक खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीचे फोन करत वैभवीला शुभेच्छा दिल्या आहेत. नीट परीक्षा उत्तीर्ण जाल्याबद्दल वैभवीचे सर्वच स्तरातून कैतुक होत आहे. 

Continues below advertisement


वैभवीने नीट परिक्षेत 147 गुण मिळवले


मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या यांची मुलगी वैभवीने नीट परिक्षेत 147 गुण मिळवले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कठिण काळात वैभवीने ही परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेमध्ये वैभवी ने 85.33 टक्के इतके गुण मिळवले होते. दरम्यान या वैभवीच्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करुन अभिनंदन केले आहे. तसेच ट्वीटरवर देखील एकपोस्ट करत वैभवचे अभिनंदन केले आहे.  मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीने वैभवीने NEET परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने ही परिक्षा देऊन उत्तम यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 


बारामती येथील भर सभेतून सुप्रिया सुळेंना केला वैभवीला फोन 


मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीने NEET परीक्षा उत्तीर्ण केली. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामती येथील सभेतून वैभवीला फोन करून शुभेच्छा दिल्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने ही परिक्षा देऊन उत्तम यश संपादन केले. या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


बारावीच्या बोर्डाच्या परक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले होते. यावेळी बोलताना वैभवी देशमुख म्हणाली होती की, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांची आठवण जागवली. 12 वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे.  संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.


महत्वाच्या बातम्या:


वैभवीनं मिळविलेलं यश तिच्या अंगभूत गुणांचं, धैर्याचं अन् जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन; अजित पवारांकडूनही संतोष देशमुखांच्या लेकीचे अभिनंदन