Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत .गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) सादर केलेल्या दोषारोपानंतर समोर आलेल्या मारहाणीच्या फोटो आणि व्हिडिओ नंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली .या प्रकरणात अद्याप एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे . दोषारोपपत्रानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी ( 12 मार्च) रोजी पहिली सुनावणी होणार आहे . मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेले वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे,सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे या प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत . या आरोपींचे जबाब दोषारोप पत्रात जोडण्यात आलेले नाहीत .बुधवारी बंद लिफाफ्यामध्ये आरोपीचे जबाब न्यायालयात सादर होतील . तर खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला जाण्याची शक्यता आहे .
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची मागणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी या मागणीसाठी मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं.
सुनावणी ठरणार महत्त्वाची
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली मोठी सुनावणी बुधवारी केज जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात होणार आहे .या प्रकरणात हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहेत .गुन्हे अन्वेषण विभागाने सादर केलेल्या दोषारोप पत्राला हे जबाब पत्र जोडण्यात आले नव्हते .मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेले प्रमुख आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे प्रतीक घुले आणि जयराम चाटे यारोपिंचे जबाब 18 प्रमाणे घेण्यात आले आहेत .साक्षीदारांचे 164 प्रमाणे जबाब घेतले गेले आहेत मात्र अद्याप ते समोर आलेले नाहीत .बुधवारी न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये आरोपींचे हे जबाब सादर होतील .तर खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मीकचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला जाण्याची शक्यता आहे .