छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या शिवसेना सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी (Khichdi Scam Case) अटक करण्यात आली आहे. तर, सुरज चव्हाण छोटा मासा असून आणखी मोठे मासे बाकी आहेत. यंदाची संक्रात कुणावरी तरी पडणार असून, मोठ्या माश्यांची वेळ आली असल्याचे शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत. याचवेळी बोलतांना त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
दरम्यान याबाबत बोलतांना शिरसाट म्हणाले की, "खिचडी प्रकरणात सुरज चव्हाणला काल अटक झाली, आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. खिचडी प्रकरण छोटे प्रकरण असलं तरीही, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक दिवसांच्या चौकश्या आणि त्याच्यानंतर केलेली ही कारवाई आहे. परंतु, सुरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे. मुख्य मासे आणखी बाजूला आहे. सुरज चव्हाण नावापुरता आहे, त्यांना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर सर्व नावं बाहेर येतील. खिचडी घोटाळ्यासह अनेक घाटाळे समोर आले. मुंबईत 26 अशी कंत्राटदार आहेत, जे कुणाच्यातरी इशाऱ्यावर कामं घेत होते. त्याच्याबद्दलचा देखील अहवाल आला आहे. एक नव्हे अनेक प्रकरण आता उघडकीस यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही संक्रात अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे. त्यामुळे छोटे मासे सोडून द्या, मोठ्या माशांचा देखील आता वेळ आला आहे," असे शिरसाट म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंवर टीका...
पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की,“सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना आदित्य ठाकरे कोणताही संबंध नसताना दावोसला गेले होते. त्यावेळी तीस-पस्तीस हजार कोटीचे काहीतरी करार केले होते. मात्र, पुढे त्या करारांचं काय झालं?, परंतु त्यानंतर मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत, त्याचे काम सुरू आहे. तसेच 4 लाख कोटींचा करार हे सुद्धा एक मोठं यश आहे. मात्र, हे लोकं टीका करत होते, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत आहे. परंतु, हे लोक टेंडरमध्ये आणि टक्केवारीत अडकलेली लोकं आहेत, असे शिरसाट म्हणाले.
पत्राचाळ प्रकरणात लवकरच कारवाई
ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर एसीबीच्या पथकाने छापेमारी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, "त्यांनी काही केलं असेल तर कारवाई होईल, नसेल केले तर मोकळे राहतील. आरोपी कोणी असो आम्ही असो की ते कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. पत्राचाळ प्रकरणात सुनावणी सुरु असून, लवकरच तुमंच्यावर (संजय राऊत) कारवाई होईल, असेही शिरसाट म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: