एक्स्प्लोर

अजित पवार विमान अपघात: रोहित पवारांच्या शंकांचं निरसण झालं पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचं : संजय शिरसाट

आमदार रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघातातबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Shirsat :  28 जानेवारी 2026 ला सकाळी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं होतं. या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रा हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघातातबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल घेणे गरजेचे आहे. त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे असे शिरसाठ म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट ?

 अजितदादा गेल्याचे दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केल्या आहेत. त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल घेणे गरजेचे आहे असं संजय शिरसाट म्हणाले. त्यांनी कालची मांडणी केली त्यात शंका घेण्याचं कारण आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, सीबीआय असो अथवा देशातील कोणतीही उच्च संस्थेनं चौकशी झाली पाहिजे असे शिरसाट म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?

सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी अजित दादांची क्रू तयारी झाली, 7 वाजून 3 मिनिटांनी बारामती येथी हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी 8.73 ते 8.45 दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल, असे रोहित पवार यांनी सांगितले. कारण, 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत अशी बातमी समोर आली होती. तर, 9.45 वाजता अजित पवार गेल्याची बातमी समोर आली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. तसेच, हे विमान 2 दिवस आधी सुरतला जाऊन आले होते. याचे मालक म्हणाले, हवामानामुळे अपघात झाला असावा अशीही माहिती रोहित पवारांनी दिली. ग्रामपंचायत सीसीटीव्ही समोर आलं आणि त्यातून हवामान परिस्थिती समोर आली आहे. CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येतं की, कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं असेल. मॅकेनिकल फेल्युअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रूटीन मेंटेनस झाला नव्हता का? असे प्रश्न उपस्थित होतं आहेत, असेही रोहित पवार यांनी म्हटले. 

दादांचा अपघात स्वप्न असल्याचा भास मला होत होता. पण, अपघाताच्या घटनास्थळी जेव्हा मी पोहोचलो, तेव्हा तिथे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सगळे निशब्द झाले होते, कुणाला काही बोलता येत नव्हतं. अपघात झाल्यानंतर दादाचा स्वेटर मी पाहिला, घड्याळ पाहिलं. अजित दादा नेहमी आपलं घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत होते, अपघातानंतर अजित पवारांच्या बंद घड्याळात 9 वाजलेले होते, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. त्यामुळे, मला सर्वांना एवढच सांगायचं आहे की, जी घटना झाली नाही, दादांना काही झालं नाही असं आपल्या सर्वांना वाटतं. पण, तसे नसून ती घटना घडलीय. आज दादा आपल्यासोबत नसले तरी विचारांनी ते आपल्यासोबत आहेत, रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी, त्यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनही केलं. 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे जहाज आढळलं, प्रशासनाकडून तपास सुरु
रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे जहाज आढळलं, प्रशासनाकडून तपास सुरु
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
धक्कादायक! चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहनानं महिलेला उडवलं, दोन मुली थोडक्यात बचावल्या, घटना CCTV मध्ये कैद 
धक्कादायक! चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहनानं महिलेला उडवलं, दोन मुली थोडक्यात बचावल्या, घटना CCTV मध्ये कैद 
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget