Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ (MinisterSanjay Shirsat) यांच्या एका वक्तव्यामुळं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला (Chhatrapati Sambhajinagar) ग्रहण लागलं आहे. पालिकेला ग्रहण लागण्याचं कारण महापालिका इमारत ज्या जागेवर उभा आहे, इथं मुडदे गाढले जायचे. कब्रस्तानचा हा भाग असल्याने इथले आत्मे तुम्हाला दिसतात आणि तुम्ही बेचैन होता. यातून मुक्ती हवी असेल तर इमारत चांगल्या ठिकाणी करा असं वक्तव्य संजय शिरसाठ यांनी केलं आहे. दरम्यान, संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण तापण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्वाटं ठरणार आहे.  

Continues below advertisement

कब्रस्तानचा भाग असल्याने इथले आत्मे तुम्हाला दिसतात आणि तुम्ही बेचैन होता

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागल्याचं वक्तव्य शिरसाठ यांनी केलं आहे. महापालिकेची इमारत ज्या जागेवर उभा आहे तिथं मुडदे काढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग असल्याने इथले आत्मे तुम्हाला दिसतात आणि तुम्ही बेचैन होता. यातून मुक्ती हवी असेल तर इमारत चांगल्या ठिकाणी करा. शहर चांगलं करायचं आहे. आत्म्यालाही सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते छत्रपती संभाजीनगर महापालिकेने खरेदी केलेल्या नव्या अग्निशामक दलाच्या गाडीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये बोलत होते. 

छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर महा पालिकेची इमारत ज्या जागेवर आहे, तिथे पूर्वी मुडदे गाडले जायचे, त्यामुळे इथे काम करताना अस्वस्थता वाटते आणि पालिकेला ग्रहण लागल्याचं वक्तव्य शिरसाठ यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुक्ती हवी असेल तर इमारत दुसऱ्या जागी स्थलांतरीत करावी, असं वक्तव्य शिरसाठ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरलं आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ