मुंबई: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगला तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्त्वात आरक्षणाची मागणी करत राज्यभरातील मराठा समाज (Maratha Samaj) एकवटला आहे. सर्व मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी आणखी तीव्र होत आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरुच आहेच. सरकार मात्र आरक्षणापासून पळत आहे. स्वत:ला मराठा समजणारे अजित पवार आरक्षणापासून दूर का पळत आहे? असा सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. आरक्षणासाठी किती बळी घेणार असा संतप्त सवाल देखील संजय राऊतांनी केला.
मनोज जरांगेंनी सरकारला एक महिन्याचे अल्टीमेटम दिले आहे. एक महिन्यात तीन तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. एक महिन्यात तीन तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. सलग होत आत्महत्यांवर सरकार काय करतय? अजित पवार आरक्षणावर बोलण्यापासून पळत आहेत. स्वत: मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांनी उत्तर द्यावं एक महिन्याच्या काळात तिघांनी आत्महत्या केल्या मात्र सरकारच्या डोळ्याची पापणीही हलली नाही. चौथी आत्महत्या झाली तर मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे संजय राऊत म्हणाले.
सरकारकडून खोट्या जाहिराती सुरु
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून जाहिरात देण्यात येत आहे. यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, सरकारकडून खोट्या जाहिराती सुरु आहेत. सरकारमधील काही लोकं वेगळी भूमिका घेत आहेत. भुजबळ लोकांना भडकावत आहेत. शिंदे गटातील काही लोकं म्हणतात आम्ही कुणबी नाही कुणबीत आरक्षण नको, मात्र हे दिशाभूल करण्याचे काम करत आहे.
फडणवीस, शिंदेंनी जरांगेंना मोदींकडे घेऊन जावं
संजय राऊत म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत तीन आत्महत्या झाल्या. पंतप्रधान मोदींना कायद्यात दुरुस्ती करण्यास सांगा. फडणवीस, शिंदेंनी जरांगेंना मोदींकडे घेऊन जावं आरक्षणासाठी किती बळी घेणार?
आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार
24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या उपोषण आंदोलन कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन करताना जरांगे यांनी शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला. मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.