Sanjay Raut on EKnath Khadse Son-In -Law: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर पुण्यात आज रेव्ह पार्टी करताना रंगेहाथ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे प्रांजल हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी सरकारवर घणाघाती प्रहार केला आहे. दुसरीकडे, गेल्या तीन दिवसांपासून गिरीश महाजन यांच्यावरही एकनाथ खडसे तुटून पडले होते. महाजन यांच्या विरोधात मोर्चा उघडला असतानाच आता जावईच रंगेहाथ सापडल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
अख्खा भारतीय जनता पक्ष रेव्ह पार्टी झाला
राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर सडकून प्रहार केला. अख्खा भारतीय जनता पक्ष रेव्ह पार्टी झाला आहे. सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल असं संजय राऊत यांनी म्हटला आहे. ते म्हणाले की या प्रकरणाबाबत माझ्याकडे काही माहिती नाही मात्र या सरकारच्या काळामध्ये कोणालाही अटक केली जाईल आणि कोणावरही गोळीबार केला जाईल आणि सरबत पिणाऱ्या माणसाला सुद्धा दारू पितो पण अटक केली जाईल.
अशी पार्टी केल्याशिवाय हनीट्रॅप करता येत नाही
ते पुढे म्हणाले की दोन दिवसांपूर्वीच खडसे साहेबांनी सरकारविरोधात खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधात ठामपणे बोलले होते. ते पुराव्यांसह बोलत होते आणि त्यानंतर पुढच्या 24 तासात ही ताबडतोब कारवाई झाली असल्याचे ते म्हणाले. एकनाथ खडसे आणि त्यांनी जे मुद्दे मांडले आहे त्याची चौकशी होत नाही. मात्र, जे आरोप करत आहेत त्यांच्या घरावर धाडी घालत असल्याचं संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव्ह पार्टी झाला आहे. अशा पद्धतीने पार्टी केल्याशिवाय हनीट्रॅप करता येत नाही, असं सुद्धा राऊत यांनी म्हटलं आहे. अशाच पद्धतीन हनीट्रॅप करून तीन ते चार खासदार आणि 15 ते 16 आमदार पळवलल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.
जेव्हा तुमच्यावर उलटेल तेव्हा महाग पडेल
राऊत यांनी पुढे सांगितले की, यंत्रणाचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करण्याचा प्रकारातून आम्ही गेलो आहोत. आमच्याकडे ईडी सीबीआय सगळे पाठवून झाले आहेत. खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढत आहोत, लढत राहू हे जेव्हा तुमच्यावर उलटेल तेव्हा महाग पडेल. दरम्यान, अमित साळुंखे यांचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे त्याचं काय झालं पोलीस कारवाई करणार आहेत का? अशीही विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या