Sanjay Raut Press Conferance : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद पार पडली. आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर भाजपचे नेते आहेत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 13 पानी पत्र लिहिलं


ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन बनले आहे.  याबाबत मी 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे.  या पत्रामध्ये  स्वच्छ भारत अभियानामध्ये नुसता कचरा नाही तर भ्रष्टाचार सुद्धा साफ करायचा आहे. ज्या ईडी ला तुम्ही सगळ्यांच्या विरोधात लावलं आहे. या संदर्भात दहा भाग मी त्यांना देणार आहे. हा आजचा एक भाग आहे.


पर्दाफाश केल्यानंतर आम्हाला अटकही करू शकता


किरीट सोमय्या ईडीचे वसुली एजंट बनले असून ठराविक लोकांना टार्गेट केलं जातंय. ईडीकडून व्यावसियाकांना, बिल्डरांना धमकाविण्याचे काम सुरू आहे याबाबत पंतप्रधान मोदींना १० भागांमध्ये पत्र लिहणार आहे, पर्दाफाश केल्यानंतर आम्हाला अटकही करू शकता, लवकरच सगळ्यांचा पर्दाफाश करू असे. आम्ही पण एक धाड टाकतोय. मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये छापे पडतील. ईडी भाजपची एटीएम मशीन असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.


आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश करणार


संजय राऊत म्हणाले,  आज मुंबईत धाडीवर धाडी पडत आहे. आमच्या घरात महाराष्ट्रात जर कोणी घुसत असेल तर शिवसेनेला देखील दुसऱ्यांच्या घरी धाडी टाकण्याचा अधिकार आहे.  देशात सर्वाधिक ईडीच्या कारवाया  म्हाराष्ट्रात झाल्या आहे.  महाविकास आघाडीच्या 14  प्रमुख नेत्यांवर   कारवाई झाली मात्र भाजपच्या लोकांवर मात्र कारवाई का होत नाही. ईडीला आणि आयटीला आतापर्यंत आम्ही 50 जणांची यादी पुराव्यासकट दिली आहे, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचा खुलासा लवकरच आम्ही करणार आहे. 


ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन 


ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन बनले आहे.  याबाबत मी 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे.  या पत्रामध्ये  स्वच्छ भारत अभियानामध्ये नुसता कचरा नाही तर भ्रष्टाचार सुद्धा साफ करायचा आहे. ज्या ईडीला तुम्ही सगळ्यांच्या विरोधात लावलं आहे. या संदर्भात दहा भाग मी त्यांना देणार आहे. हा आजचा एक भाग  असल्याचे संजय राऊत म्हणाले. 



राऊतांच्या निशाण्यावर भाजपचे नेते


याआधीही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केला होता. तसेच, भाजप नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावरही संजय राऊतांनी बोट ठेवलं होतं. मागच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्यांना (Neil Somaiya) तुरुंगात टाकणार असल्याचंही राऊत म्हणाले होते. तसेच मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरही राऊतांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर भाजपचे नेते आहेत