Sanjay Raut on Nashik Bhondu baba : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुनचांगलच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे देखील भोंदूबाबा अशोक खरातसोबत फोटो व्हायरल झाले आहेत. रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे देखील भोंदूबाबासोबतचे फोटो व्हायरल झाले आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंसह चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे यांचे भोंदूबाबासोबत असणारे फोटो शेअर केले आहेत. 

नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावरुन राजकीय नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहेत. विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट करत काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत असणारे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअरक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सवाल केला आहे. 

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

भोंदू बाबांचे कॅबिनेट असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. रुपाली चाकणकर याना जावेच लागेल असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे यांचे भोंदूबाबा अशोक खरात सोबतचे फोटो शेअर करत, मुख्यमंत्री, महोदय या भगत गणांचे काय? असा सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

लैंगिक शोषणाचे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ

भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये IPS तेजस्विनी सातपुतें यांच्या अध्यक्षतेखाली SIT अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरातची झाडाझडती सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आता याप्रकरणात सरकार कुणा कुणाला अटक करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

रुपाली चाकणकरांना टार्गेट केल जातंय, पाद्यपुजा करणं गैर नाही, त्यांना आमच्या पक्षात घेण्यासाठी शिफारस करणार, काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे