Sanjay Raut on Devendra Fadnavis: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली असली तरी मुंबईमध्ये आझाद मैदानात त्यांना आंदोलनासाठी अवघ्या एका दिवसाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे एक दिवसांमध्ये आंदोलन होतं का? एक दिवसाची परवानगी देत चेष्टा केली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मराठी माणसाला मुंबईमध्ये त्यांच्या राजधानीत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचा म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे
संजय राऊत म्हणाले की लोकं कबुतरासाठी आंदोलन करतात. सरकार त्यांना परवानगी देतं. मग मराठी माणसाला त्यांच्या राजधानीमध्ये आंदोलन करण्यासाठी अधिकार असल्याचे ते म्हणाले. ही राजधानी कोकण, विदर्भ, मराठवाडा सगळ्यांची असल्याची ते म्हणाले. त्यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलकांना थांबवू नये अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे सांगितले की मराठी माणसाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
फडणवीस यांनी जाती जातींमध्ये तुकडे पाडण्याचं काम केलं
ते म्हणाले की आम्ही आरक्षणाचं राजकारण केलेलं नाही. मात्र, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाती जातींमध्ये दहा वर्षांमध्ये तुकडे पाडण्याचं काम केलं असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच एकजूट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम फडणवीस यांनी केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मराठी माणसाची एकजूट मोडून फडणवीस यांनी सत्ता मिळण्यासाठी राजकारण केल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या