Sanjay Raut : आम्हाला हिंदुत्व शिकवताय? तुम्ही कधी हिंदू झालात? पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह आणि फडणवीसांना राऊतांचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), अमित शाह (Amit Shah), देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. तुम्ही कधी हिंदू झालात? असा सवाल संजय राऊतांनी केला.

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), अमित शाह (Amit Shah), देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. तुम्ही कधी हिंदू झालात? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वत:ला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो असेही राऊत म्हणाले. आम्ही ते करत नाही. आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलं आहे. आम्ही लढायला, संघर्ष करायला तयार आहोत, तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल करा असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहायला आम्ही तयार आहोत, तुमचं सगळं ढोंग उघडे पाडू असा इशाराही राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. शिवसेना ठाकरे गटाचे आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत निर्धार शिबीर संपन्न होत आहे. यावेळी राऊत बोलत होते.
आजच्या शिबीराने दाखवून दिले आहे की, नाशिकचा शिवसैनिक आहेत तसाच आहे. यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिला आहे. पराभवाने आम्ही खचून जाणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाट्याला जो संघर्ष आला तोच संघर्ष शिवसेनेच्या वाट्याला आल्याचे संजय राऊत म्हणाले. कवीभूषण संभाजीराजेंना सांगतो की, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गये जो बिना लढे उनपर है धिक्कार हा शेअर देखील संजय राऊत यांनी वाचून दाखवला. नाशिकच्या पराभवचा विश्लेषण वॉश्गिंटनमध्ये झाले. तुलसी गबार्ड ही साधी बाई नाही ही मोदींची बहिण आहे. ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागामध्ये प्रमुख आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते, यामुळं निकाल बदलले जाऊ शकतात हे त्यांनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. मोदींनी त्यांच्या हातात गंगाजल दिले आहे, त्यामुळं त्या खोट्या बोलणार नाहीत असे राऊत म्हणाले.
नाशिकमध्य शिवसेनेचे शिबीर सुरु आहे म्हणून भाजपने दर्गे पाडण्याचे काम हाती घेतले
नाशिकमध्ये सकाळपासून उत्साहाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांच्या संदेशाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवसैनिक तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असल्याचे संजय राऊत म्हणाले. नाशिकच्या शिवसैनिकांनी तन मन धन लावून शिबिर यशस्वी केले आहे. नाशिकमध्य शिवसेनेचे शिबीर सुरु आहे म्हणून भाजपने दर्गे पाडण्याचे काम हाती घेतले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, टीव्हीवर आपल्या बातम्या दिसू नये म्हणून हे काम काढळ्याचे राऊत म्हणाले. पण त्यापलिकडे जाऊन शिबिर होतं असल्याचे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























