Sanjay Gandhi National Park Mumbai : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park (SGNP)) पर्यटक सेवांच्या शुल्कात मोठी (Pass Price Hike) वाढ करण्याचा प्रस्ताव समोर आला असून, विशेषतः सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) येणाऱ्या नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा टाकला जाणार आहे. यामध्ये काही श्रेणीतील शुल्क थेट 348 रुपयांवरून 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचे कागदपत्रांवरून समोरआलं होतं. ज्यामध्ये वर्षासाठी 383 रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 45 रुपये तिकिटं आकरण्यात येत होते. मात्र आता ते सर्वसामान्य नागरिकांसाठी 10 हजार तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 हजार करण्यात आल्याचाप्रस्तावहोता. मात्र, या प्रस्तावावरून स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरदुसरीकडेया दरवाढी विरोधात मनसेनेतीव्रविरोधदर्शवत मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचाइशारादिलाहोता. (Sanjay Gandhi National Park Pass Price Hike)
एकंदरीत, वाढताविरोधलक्षातघेतामुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रस्तावित तिकीट दरवाढीचा निर्णय अखेर स्थगित करण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागाने काही दिवसांपूर्वी उद्यानातील प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यासोबतच नवीन तिकीट प्रणाली (ticketing mechanism) लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीला सध्या ब्रेक लावण्यात आला आहे.
MNS : बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दरवाढीवरून मनसे आक्रमक
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दरवाढीवरून मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचेबघायलामिळालंआहे. दरवाढीच्या विरोधात मनसेनेते नयन कदम यांनी मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्याची थेट धमकी देतप्रशासनालाइशारादिलाहोता. मनसेच्या या धमकीनंतर वन विभागाने नवीन दारांवर स्थगितीदेतनिर्णय मागेघेण्याचा निर्णयघेतलाआहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मॉर्निंग वॉक पासच्या दरात वाढ झाल्याची माहिती मिळताच मनसे नेते नयन कदम कार्यकर्त्यांसह थेट वन विभागाच्या कार्यालयात पोहोचून अधिकाऱ्यांनाभेटलेहोते. यावेळी दरवाढीविरोधात भूमिका बजावली आणि दर का वाढवण्यात आला असाजाबविचारण्यातआला. त्यानंतरआताप्रशासनानेनिर्णयालास्थगितीदिल्याचीमाहितीआहे.
Mumbai : एवढे जास्त शुल्क आकारणे योग्य नाही
प्रशासनाच्या मते, उद्यानातील वाढते व्यवस्थापन खर्च, देखभाल, सुरक्षा, स्वच्छता आणि सुविधा सुधारणा यासाठी ही शुल्कवाढ आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन तिकीट प्रणाली लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे पर्यटकांना सुलभता मिळेल, असा दावा करण्यात आला. मात्र, या प्रस्तावावरून स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “सार्वजनिक उद्यानात फिरण्यासाठी एवढे जास्त शुल्क आकारणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे. परिणामीनागरिकांनीविरोधकेल्यानंतरयानिर्णयालास्थगितीदेण्यातआलीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
