एक्स्प्लोर

Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई

Sanjay Gaikwad Controversy : संजय गायकवाड मारहाण प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने आकाशवाणी आमदार उपाहारगृहावर कारवाई केली आहे.

मुंबई : आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधे निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली. निकृष्ट जेवण मिळाल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर या कॅन्टीनमधील पदार्थाची एफडीएने तपासणी केली. त्यानंतर हा परवाना निलंबित करण्यात आला.

आमदार संजय गायकवाड यांनी ज्या आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये मारहाण केली होती, तिथे अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचं पथक दाखल झालं. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटीनमधील संपूर्ण स्टोअर रूमची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे सॅम्पल गोळा केले. हे सगळे नमुने सील करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. तपासणी दरम्यान स्टोअर रूमचं ऑडिटही करण्यात आलं. संपूर्ण अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.

आमदार गायकडांची कर्मचाऱ्याला मारहाण

नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गुंडगिरीचा नमुना दाखवला, तोही थेट लोकप्रतिनिधींचं वास्तव्य असलेल्या आमदार निवासात. आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गायकवाडांना निकृष्ट जेवण मिळालं. त्यामुळे संतापलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यांच्या राड्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उडवली.

मारहाणीवेळी संजय गायकवाड हे चक्क बनियन आणि टॉवेलवर होते, यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. हा सत्तेचा माज असल्याचा आरोप विरोधकांनी केला. ठाकरेंचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत गायकवाडांच्या निलंबनाची मागणी केली. ही गंभीर बाब असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, असं मत व्यक्त केलं.

पण इतकं सगळं होऊनही संजय गायकवाडांचा उद्दामपणा कायम असल्याचं दिसून आलं. झालेल्या कृत्याचा पश्चाताप नसल्याचं स्पष्ट करत ही आपली शिवसेना स्टाईल आहे असं गायकडवाडांनी सांगितलं. त्यानंतर गायकवाड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आणि कॅन्टीनच्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार केली.

दरम्यान, संजय गायकवाडांची ही कृती योग्य नसून त्यांना समज दिली आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर दुसरीकडे संजय गायकवाड प्रकणावरून उद्धव ठाकरे यांनी वेगळीच शंका व्यक्त केली. हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रकार आहे, त्यांनी सावध राहिलं पाहिजे, असा सल्ला ठाकरेंनी दिला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'

व्हिडीओ

Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
Embed widget