Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात धक्कादायक घटनाघडली आहे. मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
Continues below advertisement
काही भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती
जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जत मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मृतांची नावे
शंकर आबा लोखंडे पाडोझरीमंगल भाऊसो मोठे पांडोजरीसंजूबाई राम चौधरी पांडोजरी कोंडीबा गेजगे दरीबडचीतर आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, असे एकूण सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. र अनेक भाविका गंभीर जखमी झाले आहेत.
Continues below advertisement
वाऱ्याच्या तडाख्याने भिंत कोसळली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. भाविकांची मोठी गर्दी होती. वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे भाविकांनी शेडच्या भिंतीला आडोसा म्हणून आसरा घेतला पण भिंत चिऱ्याच्या दगडाच्या बांधकामाची होती. वाऱ्याच्या तडाख्याने भिंत कोसळली त्यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी, इतर 15 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जत प्रशासन व पोलिसांची तातडीने धाव घेतली असून जतचे प्रांताधिकारी नष्ठे यांची घटनास्थळी भेट, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. मृतांपैकी तीन जण विजापूर तालुक्यातील व तीन जण जत तालुक्यातील आहेत.
मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा भरल्यामुळं भाविकांची मोठी गर्दी होती
जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. त्यामुळं या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पण अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळं भितं कोसळल्याची घटना घडल्याची माहिती प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे. बांधकामावरी पत्रे उडून भिंतीवर पडले त्यामुळं भितं पडली. यामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 भाविक जखमी झाल्याची माहिती प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: