Sangli loksabha Chandrahar Patil : महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे (Sangli Loksabha) उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्यासह समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यामुळं हा गुन्हा दाखल झालाय. चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात विनापरवाना प्रचार फेरी काढली होती.  त्यानंतर पाटील यांच्यासह 2 ते 3 समर्थक  कार्यकर्त्यांवर गुन्हा आचारसंहिता भंगाचा दाखल करण्यात आलाय.


 प्रचार पदयात्रा काढण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही


24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30  या वेळेत खटाव, बेडग गावात  मतदारांच्या गाठीभेटी घेऊन  लोकसभा  निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील यांनी प्रचार पदयात्रा काढली होती. मात्र, ही प्रचार पदयात्रा काढण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळं पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळं त्यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच निवडणूक आयोगाकडून नियमावाली प्रसिद्ध करण्यात येते. यामध्ये आचारसंहितेसंदर्भात काही नियम असतात. त्या नियमांचे निवडणुकीच्या काळात पालन करणं प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक असते. मात्र, नियमांचा भंग केल्यास कारवाई होते. 


सांगली लोकसभेतील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात 


सांगली लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीनं त्यांना उमेदवारी दिल्यामुळं सांगली काँग्रेसचे नेते नाराज आहे. कारण विशाल पाटील यांना तिकीट मिळावं यासाठी काँग्रेस नेते आग्रही होते. मात्र, त्यांना तिकीट मिळालं नाही. अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं सांगली लोकसभेत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभेतील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Nana Patole on Sangli Loksabha : सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट उतरल्याशिवाय राहणार नाही, पण मशाल पेटवावी लागेल; नाना पटोलेंकडून सबुरीचा सल्ला!