शिर्डी : कोणताही सणवार असो... फ्लिपकार्ट-अमेझॉनसारख्या कंपन्यांच्या बंपर ऑनलाईन सेलची जाहिरात आपल्याला दिसतेच. पण या सेलमुळे दुकानदारांचे बारा वाजले आहेत. त्यामुळेच ऑनलाईन कंपन्यांविरोधात दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी बंड पुकारलं आहे.


ऑनलाईन कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी संगमनेरमधल्या व्यापाऱ्यांनी आयडिया लढवली. लाखो रुपयांचा माल त्यांनी ऑर्डर केला, पण जेव्हा माल दुकानात आला, तेव्हा स्वीकारलाच नाही.

दसऱ्याच्या बसलेला फाटका दिवाळीतही बसू नये, म्हणून दुकानदारांनी आता बॅनरबाजीही केली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर गुजरातमधल्या व्यापाऱ्यांनीही अशी चळवळ सुरु केली आहे.

सुरतमधल्या व्यापाऱ्यांनी तर 100 कोटींचा माल ऑर्डर करुन नाकारला. त्यामुळे डिलीव्हरी बॉईजची गोची झाली.
सगळा माल रोडवरच असल्याने त्याला सांभाळण्यासाठी सुरक्षा द्यावी लागत आहे.

ऑनलाईन कंपन्यांमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय, हे खरं. पण त्यासाठी अवलंबलेला मार्ग योग्य आहे का? याचा विचार करायला हवा!

पाहा व्हिडीओ