एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : संजय राऊतांविरोधात संजय शिरसाट आक्रमक, मानहानीचा खटला दाखल करणार

Sanjay Shirsat Vs Sanjay Raut : संजय शिरसाट त्यांच्यावरील आरोप फेटाळत असतील तर आणखी व्हिडीओ बाहेर काढू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.

मुंबई : पैशाच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहेत. या संबंधी शिरसाट हे त्यांच्या वकिलांचा सल्ला घेत असल्याची खात्रिलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरुन शुक्रवारी दिवसभर राजकीय गोंधळ झाल्याचं पाहायलं मिळालं.

संजय शिरसाट यांच्या बेडरुममधील एक व्हिडीओ संजय राऊतांनी शेअर केला. त्यामध्ये संजय शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेली एक बॅग दिसते. शिरसाटांनी हा व्हिडीओ त्यांचा असल्याचं मान्य केलं असलं तरी त्या बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याची सारवासारव केली. त्यानंतर शिरसाट आऱोप फेटाळत असतील तर आणखी व्हिडीओ बाहेर काढू असा इशारा संजय राऊतांनी दिला.

संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा खटला?

संजय राऊतांनी आपली बदनामी केल्याची भावना शिरसाटांची असून ते आता राऊतांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी शिरसाट हे वकिलांचा सल्ला घेत आहेत.

संजय शिरसाटांचा पाय खोलात

आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ. एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अडचणीत सापडले आहेत. शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत दोन बॅगा दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला. हा व्हिडीओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केला.

हा व्हिडीओ आपल्याच बे़डरूममधला असल्याचं शिरसाटांनी मान्य केलं. पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग असल्याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं. दरम्यान, शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममध्ये त्यांचा हा व्हिडीओ कुणी काढला आणि तो राऊतांना कुणी पाठवला, याची चर्चा सुरू आहे. मात्र या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचा मुद्दाही चर्चेत आला.

विशेष म्हणजे संजय शिरसाटांना आदल्याच दिवशी आयकर विभागाची नोटीस आली होती. या निवडणुकीमध्ये त्यांच्या वाढलेल्या संपत्तीचा हिशोब त्यामध्ये विचारण्यात आल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
Bihar Election Result 2025: बिहारी लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव अन् यूपीमधील रमीज आहेत तरी कोण? दोघांच्या फ्रंट सीट 'तेजस्वी' कारभाराने यादवांमध्ये महाभारत!
बिहारी लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव अन् यूपीमधील रमीज आहेत तरी कोण? दोघांच्या फ्रंट सीट 'तेजस्वी' कारभाराने यादवांमध्ये महाभारत!
Navi Mumbai :पैश्यासाठी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप; मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप
मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप; पैश्यासाठी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Pimpri Chinchwad Election : नगरसेवक व्हायचंय, मतदारांना 50 टक्क्यांत वस्तूंचं आमिष, धक्कादायक प्रकार
Raj Thackeray on BMC Election : मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवतीर्थावर आज मनसेची बैठक
Chandrahar Patil Majha Katta LIVE : देशभर गाजलेली Bailgada Sharyat , जिंकलेले मालक माझा कट्टावर
Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
Bihar Election Result 2025: बिहारी लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव अन् यूपीमधील रमीज आहेत तरी कोण? दोघांच्या फ्रंट सीट 'तेजस्वी' कारभाराने यादवांमध्ये महाभारत!
बिहारी लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव अन् यूपीमधील रमीज आहेत तरी कोण? दोघांच्या फ्रंट सीट 'तेजस्वी' कारभाराने यादवांमध्ये महाभारत!
Navi Mumbai :पैश्यासाठी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप; मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप
मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप; पैश्यासाठी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप
Rohini Acharya Quits Politics: राजदच्या पराभवानंतर लालू यादवांच्या घरात उभी फूट, बापासाठी किडनी दान करत बुलंद कहाणी झालेल्या लेकीनं थेट मध्यरात्री घर सोडलं!
राजदच्या पराभवानंतर लालू यादवांच्या घरात उभी फूट, बापासाठी किडनी दान करत बुलंद कहाणी झालेल्या लेकीनं थेट मध्यरात्री घर सोडलं!
Delhi Blast Al-Falah University: दिल्ली दहशतवादी हल्ल्यात आणखी तिघांच्या मुसक्या आवळल्या; थेट अल फलाह विद्यापीठाविरोधात दोन गुन्हे दाखल
दिल्ली दहशतवादी हल्ल्यात आणखी तिघांच्या मुसक्या आवळल्या; थेट अल फलाह विद्यापीठाविरोधात दोन गुन्हे दाखल
Indurikar Maharaj New Video: मुलीच्या साखरपुड्यावरुन टीका, आता इंदुरीकर महाराजांचा नवीन व्हिडीओ; म्हणाले, लग्न जोरात करणार, बोंबलायचंय बोंबला!
मुलीच्या साखरपुड्यावरुन टीका, आता इंदुरीकर महाराजांचा नवीन व्हिडीओ; म्हणाले, लग्न जोरात करणार, बोंबलायचंय बोंबला!
RCB Retained Players List 2026 : लैंगिक शोषणमुळे कायद्यांतर्गत गुन्हा, तरी RCB ने 'त्या' खेळाडूला केलं रिटेन, बंगळुरूने कोणाला संघात कायम ठेवले, कोणाला सोडले?
लैंगिक शोषणमुळे कायद्यांतर्गत गुन्हा, तरी RCB ने 'त्या' खेळाडूला केलं रिटेन, बंगळुरूने कोणाला संघात कायम ठेवले, कोणाला सोडले?
Embed widget