Samruddhi Mahamarga Accident: समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. महामार्ग सुरू झाल्यापसून अनेक छोटे मोठे अपघात झाला आहे. सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री झाले आहे.  मध्यरात्री छत्रपती संभाजी नगरच्या  समृद्धी महामार्गावर  मोठा अपघात झाला आहे. अपघातात  बारा जणांचा मृत्यू झालाय. गेल्या चार महिन्यात महामार्गावर तीन भीषण अपघात झाले आहे. अपघातांच्या मालिकेनंतर समृद्धीवर प्रवास करायचा की नाही असा प्रश्न आता पडत आहे.



1 जुलै 2023 –  समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ येथे विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता. 1 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास झाला होता.  अपघातावेळी ड्रायव्हर झोपला होता आणि त्यामुळे बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला. 


1 ऑगस्ट 2023 –   ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, मध्यरात्रीच त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. 


15 ऑक्टोबर 2023 – बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या ट्रॅव्हलरला वैजापूरजवळ जांबरगाव टोलनाक्यावर झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी झाले आहेत.  नाशिक जिल्ह्यातील 35 भाविक बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते.. ते तेथून परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झालाय.  ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक बसली...समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.


समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यात घडलेले अपघात


या महामार्गावर गेल्या सहा महिन्यात जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झालेअसून त्यामध्ये जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे.


समृद्धी महामार्ग हा जरी राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग असला तरी मात्र यावरील होणाऱ्या अपघाताच प्रमाण बघता आता तरी सरकारने जागे होणे आवश्यक आहे.


हे ही वाचा :


मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू; घटनास्थळी मदतकार्य सुरू