परभणी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) असो किंवा भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी  (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशी वक्तव्य केली जात असताना मी तरी किती बोलायचं. समाज हे सर्व बघत आहे. यांनी केलेली वक्तव्य खरी असतील तर त्यांनी समोर येऊन ते खरे कसे आहेत हे सांगावं. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं. कारण त्यांच्या पक्षातील नेतेच अशी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी याची उत्तरे द्यावेत अशी मागणी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी केली आहे. ते परभणीत बोलत होते.

  


शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल यांच्या विधानावरून राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह संभाजीराजे यांच्याकडून निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे. राज्यपाल यांच्या वक्तव्यानंतर  भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 


सुधांशू त्रिवेदी  यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्या 'शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली' असं म्हटलं. त्रिवेदी यांच्या या वक्तव्या विरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीका होत आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. संभाजीराजे यांनी त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. 


छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असस, असे त्रिवेदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


दरम्यान, राज्यपाल भगतिसंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्या या वक्तव्यानंतर आता संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Politics Ajit Pawar: राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया