Praveen Gaikwad News : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली आहे. या घटनेवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खसदार संजय राऊतांसह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोण काय म्हणाले?
भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली : संजय राऊत
प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे? भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे! महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे असे संजय राऊत म्हणाले.
जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार : प्रकाश आंबेडकर
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशारितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
आम्ही प्रवीण दादांच्या सोबत : जितेंद्र आव्हाड
पुरोगामी विचारधारेचे पाईक, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर आज जो भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी आता बोलायचच नाही, त्यांच्या नेत्यांनी विरोधाचा आवाज काढायचाच नाही, यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचे मत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. पण प्रवीण दादा आणि त्यांच्यासारखे लाखो पुरोगामी अनुयायी अशा भ्याड हल्ल्याने गप्प बसणार नाहीत. आम्ही प्रवीण दादांच्या सोबत आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याचा पुन्हा एकदा तीव्र निषेध असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या: