मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षक-गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील १८१ पदांची भरती करण्यात येणार आहे. महान्यूजच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
पूर्व परीक्षा रविवार, दि. २९ जानेवारी २०१७ रोजी होणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१६ अशी आहे. अधिक माहितीसाठी https://mahampsc.mahaonline.gov.in किंवा www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.