नवी दिल्ली : साहित्य अकादमीतर्फे 2025 वर्षासाठीच्या प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची (Sahitya Akademi Award 2025) घोषणा करण्यात आली आहे. देशातील मान्यताप्राप्त 24 भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून मराठी भाषेसाठी ‘काळयानिळ्या रेषा’ (Kalyanilya Resha) या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर (Raju Baviskar) यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत होणार आहे.

साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत असते. दरवर्षी विविध भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केले जातात.

Kalyanilya Resha Marathi Literature : ‘काळयानिळ्या रेषा’ आत्मकथेला मानाचा पुरस्कार

मराठी साहित्यविश्वात चर्चेत असलेल्या ‘काळयानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखक राजू बाविस्कर यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवासाचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या साहित्य अकादमी पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला असल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Sahitya Akademi Award Selection Committee : तज्ज्ञ समितीकडून निवड

यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, साहित्य समीक्षा, आत्मकथा आणि संस्मरण अशा विविध साहित्य प्रकारांतील पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळामध्ये मंगला गोडबोले, नागोराव तम्माजी उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता.

Sahitya Akademi Award Ceremony : 31 मार्चला वितरण

साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. सन 2025 च्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

Sahitya Akademi Awards 2025 : विविध भाषांतील विजेते

यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये विविध भाषांतील साहित्यकृतींना गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही प्रमुख विजेते पुढीलप्रमाणे –

असमिया – कड़ि खेलर साधु (देवब्रत दास)

बंगाली – श्रेष्ठ कबिता (प्रसून बंद्योपाध्याय)

इंग्रजी – क्रिमसन स्प्रिंग (नवतेज सरना)

हिंदी – जीते जी इलाहाबाद (ममता कालिया)

गुजराती – भट्टखडकी (योगेश वैद्य)

मराठी – काळयानिळ्या रेषा (राजू बाविस्कर)

मलयाळम् – मायामानुष्यर (एन. प्रभाकरन)

पंजाबी – सेफ्टी किट (जिंदर)

तमिळ – तमिळ सिरुकथैयिन थडंगल (सा. तमिळसेलवन)

उर्दू – सफ़र जारी है (प्रितपाल सिंह बेताब)