Sadabhau khot on Raju shetti : राजू शेट्टी (Raju shetti)  हे शेतकऱ्यांसाठी (Farmers) नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते असं वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी केलं आहे. शिराळामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने (MP Dhairsheel Mane) यांच्या सत्कार सभेमध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी त्यांनी राजू शेट्टींवर जहरी टीका केली.


नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?


हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. यानिमित्त धैर्यशील माने यांचा सत्कार सोहळा शिराळमध्ये आयोजीत केली होता. या कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर जहरी टीका केली. लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी मी महाविकास आघाडीकडे गेलो होतो. सतेज पाटील आणि जयंत पाटील यांना मी निवडून आलो तर महाविकास आघाडीबरोबरच राहीनं असं लिहून देतो असे राजू शेट्टी म्हणाले होते, असं सदाभाऊ खोत म्हणाले. जो माणूस म्हणत होता मी अपक्ष राहणार आहे, मी कोणाच्याच आघाडीत जाणार नाही, मी शेतकऱ्यांसाठी लढणार आहे, मी शेतकऱ्यांचा उमेदावर आहे, पण त्याच माणसानं जयंत पाटील आणि सतेज पाटलांना लिहून दिलं होतं की, मी तुमचाच गुलाम राहणार आहे, असं म्हणत खोतांनी शेट्टींवर टीका केली. त्यामुळं राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी नाहीतर खासदारकीसाठी लढत होते असेही खोत म्हणाले. 


राजू शेट्टींना शेतकऱ्यांचं काही देणघेणं नाही


राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते, ते खासदारकीसाठी लढत होते. त्यांना शेतकऱ्यांचं काही देणघेणं नव्हतं असे सदाभाऊ खोत म्हणाले. दरम्यान, हातकणंगले लोककसभा मतदारसंघाची यावेळी जोरदार चर्चा झाली होती. कारण, शिवसेना ठाकरे गटानं पाठिंबा द्यावा, अशी भूमिका राजू शेट्टींनी मांडली होती. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होऊन आमच्या पक्षावर निवडणूक लढवण्याची अट राजू शेट्टींसमोर घातली होती. त्यामुळं राजू शेट्टींनी फारकर घेत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना ठाकरे गटानं सत्यजीत पाटील यांना उमेदावरी दिली होती. धैर्यशील माने आणि सत्यशील यांच्यातच खरी फाईट झाली. राजू शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत धैर्यशील माने यांनीचं बाजी मारली.


महत्वाच्या बातम्या:


शरद पवारांनी 60 वर्ष मराठ्यांना चुना लावला, पण चुना लावणारा माणूस यशस्वी झाला, खोतांची जहरी टीका