मुंबई :  मनसुख हिरण  मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे  यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे.  वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. काल रात्री पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आलेत. सचिन वाझे आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत होते.


मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे चांगलेच अडचणीत आले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू झाला. विरोधी पक्षांनी हिरण यांच्या मृत्यूचा संशंय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. 


कोण आहेत सचिन वाझे?



  • सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.

  • नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.

  • सचिन वाझे करीब 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.

  • वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.

  • सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.

  • सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.

  • 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.

  • 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले.