Sachin Pilot on Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी वेळबद्ध आणि उच्चस्तरीय, पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. मी माझ्या वडिलांना गमावले आहे; तो एक अपघात होता, पण अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते असे सचिन पायलट यांनी सांगितलं.
सीमा सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची
बांगलादेशी घुसखोरीवर बोलताना सचिन पायलट म्हणाले की, निवडणुका आल्या की भाजप घुसखोरांचा मुद्दा पुढे करते. सीमा सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मग तो पश्चिम बंगाल असो किंवा बिहार. सीमा संरक्षण राज्य पोलीस नव्हे, तर केंद्रीय दलच करतात. जर बेकायदेशीर स्थलांतरित असतील, तर सरकारने त्यांची माहिती जाहीर करावी आणि त्यांना त्यांच्या संबंधित देशात परत पाठवावे. हा मुद्दा राजकारणाचा विषय बनवू नये, असे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून ते म्हणाले की, हा निर्णय सर्वसंमतीनेच घ्यावा लागेल. अशा प्रकारचे निर्णय कोणत्याही एकट्या पक्षाने घेता येत नाहीत. आपण सर्वजण एकत्र काम करत आहोत आणि INDIA आघाडी मजबूत आहे. ती अतिशय चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या राज्यसभेवर बोलताना त्यांनी सांगितले की, हा विषय पक्षांतर्गत चर्चेनंतरच आम्ही बोलू. सध्या या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. गलगोटीया विद्यापीठाच्या कारभारावरूनही सचिन पायलट यांनी तोफ डागली. ते म्हणाले की, तो कार्यक्रम सरकारी होता, खासगी नव्हता. अशा घटना लाजिरवाण्या आहेत आणि उद्योजक व स्टार्टअप्सचा आत्मविश्वास कमी करतात. अशा कार्यक्रमांची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या
