Pune News  :  जे लोक आपल्याला सोडून गेलेत त्यातील अनेकजण संपर्कात आहेत. गेलेले लोक परत येतील असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केलं. गेले ते गेले पण आपल्यासोबत जे आहेत, त्यांना सोबत घेऊन लढायच आहे. सचिन अहिर पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी बोलताना सरकारवर टीका केली. 

Continues below advertisement

पुणे शहरात सव्वा तीन लाख मतदार दुबार

पुणे शहरातील सव्वा तीन लाख मतदार दुबार आहेत. मतदार याद्या जाणून बुजून फोडल्या गेल्या आहेत. गणेश मंडळावरील सरकारने नोटिसा मागे घेतल्या पाहिजे असेही अहिर म्हणाले. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असेही अहिर म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडून सरसकट क्लीन चिट दिली जात आहे. याबाबत आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवू असे अहिर म्हणाले. आम्ही आमच्या चिन्हावर नगरपरिषद निवडणुका लढवत आहोत असेही ते म्हणाले. 

उदय सामंत आमच्याकडे आले नाही पण...

उदय सामंत आमच्याकडे आले नाही पण कुठे जाणार नाही, असे होणार नाही असं म्हणत सचिन अहिर यांनी टोला लगावला. वोट चोरीचा नारा काँग्रेसने दिला आहे. मनसे रस्त्यावर चालते, आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीमध्ये मनसे का नको? असा सवाल अहिर यांनी केला. पुण्यात जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ असेही ते म्हणाले.

Continues below advertisement

 निवडणूक आयोग जबाबदारी टाळत  आहे

वोट चोरी देशभर सुरू आहे. महापालिकेमध्येही दुबार नाव नोंदणी झाली आहे. ती यादी ग्राह्य धरली जात आहे, महापौर यांचेही नाव दुबार आले. मुंबई महापालिकेचा आढावा घेतला आहे असे अहिर म्हणाले. मविआ म्हणून आम्ही भूमिका मांडली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दुबार नोंदणी झाली आहे. निवडणूक आयोगाला माविआ शिष्टमंडळ भेटले आहे. निवडणूक आयोग जबाबदारी टाळत असल्याचे सचिन अहिर म्हणाले. महापालिका आयुक्तांना घरोघरी जाऊन तपासा असे आयोगाने सागितले आहे. पण महापालिकेकडे एवढे मनुष्यबळ आहे का? हा मोठा प्रश्न आहे असे अहिर म्हणाले. अनेक मतदारांच्या नावात प्रभाग अदलाबदल झाले आहेत. अनेकांचे ग्रामीण मधून शहरी आणि शहरातील ग्रामीण असे झाले आहेत. यात संशय आहे. नावे आणि पत्ते यात तफावत आहे असे अहिर म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

मराठींविरुद्ध बरळणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंची मुंबईत कोट्यवधींची संपत्ती; सचिन अहिरांची सभागृहात माहिती