नागपूर: देशात सकारात्मक बदल घडत असल्याचा दावा मोदी सरकार करत असले. शिवाय सरसंघचालकांनीही मोदी सरकारच्या पाठीवर प्रशंसेची थाप दिली असली. तरी संघ परिवारात अनेकांना देशात फारसे काही सकारात्मक बदल होत नसल्याचे संघप्रणित कामगार संघटना भारतीय मजूर संघाच्या नेत्यांना वाटतं आहे.


नागपुरात भारतीय मजूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगळी यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात बोलताना भारतीय मजूर संघाचे अखिल भारतीय महासचिव वीरशेजी उपाध्याय यांनी मजुरांच्या वर्तमान दुरावस्थेचा पाढा वाचत, मोदी सरकारला घरचा आहेर दिला.

''आज सर्वत्र कंत्राटी कामगार ठेवण्याचे प्रमाण वाढले असून सध्या देशात तब्बल 67 टक्के कंत्राटी कामगार आहेत. वर्तमान सरकारांच्या धोरणामुळे 2023पर्यंत कंत्राटी कामगारांची संख्या 93 टक्क्यां पोहोचेल. तेव्हा नियमित कर्मचारी फक्त 7 टक्के एवढेच उरतील. एवढेच नाही तर वर्तमान आर्थिक धोरणांमुळे मजूर आंदोलनच नाही, तर कामगार संघटना ही कमकुवत झाल्याची,'' खंत उपाध्याय यांनी व्यक्त केली.