Mohan Bhagwat: एआय आणि नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगार जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. तंत्रज्ञानाला नाकारायला नको. आपल्याकडे हात आहेत, त्या हातांना काम हवंय. रिकामं डोकं सैतानाचे घर बनते, त्यामुळे हाताला काम पाहिजे. काम नसेल तर तरुण नक्षलवादाकडे वळतील, असे मत सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'संघ प्रवासाची 100 वर्षे: नवे क्षितिज' या विषयावर मोहन भागवतांची दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. मान्यवरांसोबत प्रश्न-उत्तरांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Continues below advertisement

एससी-एसटी सरसंघचालक होणार का? याबाबत विचारले असता मोहन भागवत म्हणाले की, विद्यमान सरसंघचालक पुढील सरसंघचालक निवडतात. जबाबदारीतून निवृत्ती होऊ शकते. 75 व्या वर्षानंतर जबाबदारीमधून निवृत्त होऊन काम करावं हे संघात दिसतं.  मी पदावर राहावं ही माझी इच्छा नाही. संघ सांगेल ते होईल, निवृत्तीचे कारण काय ते पाहावे. कुणाला निवृत्त करावं, अशी वेळ अजून आली नाही. सरसंघचालक ब्राम्हण, क्षत्रिय, क्षुद्र बनू शकत नाही, तर हिंदू बनू शकतो. मला ज्यावेळी संघचालक बनवायचं असेल त्यावेळी मी विचार करेल जो सक्षम असेल तो संघ चालक होईल, असे त्यांनी म्हटले.  

Mohan Bhagwat: भारताच्या एकतेसाठी एकत्र आलं पाहिजे

भ्रष्टाचार दूर कसा करायचा? भाषेच्या आधारावर भेदभाव केला जात आहे तो कसा दूर करायचा? असे विचारले असता मोहन भागवत म्हणाले की, मराठी लोकं काय रस्त्यावर तलवार घेऊन उतरत नाहीत. शेवटी आपण कुणाचा स्वभाव कसा असेल सांगू शकत नाही. भाषिक वाद मिटवयाचे असतील तर एकमेकांच्या घरी गेलं पाहिजे.  सुख दुःखात सहभागी झालं पाहिजे. ज्यावेळी देशाचा विषय येईल, त्यावेळी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. भ्रष्टाचारी समोर आणायला संघ प्रयत्न करेल. भ्रष्टाचार व्यवस्थेत नाही तर मनात होत असतो. व्यवस्थेला बिघडवणारे आणि सुधरवणारे आपणच आहोत. भाषेच्या आधारावर समाजात भेदभाव नाही. काहींकडून हे होतं, स्थानिक प्रश्नाला मोठं करू नये. भारताच्या एकतेसाठी एकत्र आलं पाहिजे. 

Continues below advertisement

Mohan Bhagwat: काम नसेल तर तरुण नक्षलवादाकडे वळतील

भ्रष्टाचाराबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले की, स्वयंसेवकांना या विरोधात उभे राहण्याचे सांगितले आहे. भ्रष्टाचार व्यवस्थेत नाही तर माणसाच्या मनात असतो. मासा पाण्यात असताना कधी पाणी पितो हे कळत नाही, त्याप्रमाणे सरकारमध्ये कधी भ्रष्टाचार होतो ते कळत नाही. संघ स्वयंसेवक गरीब असला तरी भ्रष्टाचार करणार नाही. एआय आणि नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगार जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. तंत्रज्ञानाला नाकारायला नको. आपल्याकडे हात आहेत, त्या हातांना काम हवंय. रिकामं डोकं सैतानाचे घर बनते, त्यामुळे हाताला काम पाहिजे. काम नसेल तर तरुण नक्षलवादाकडे वळतील, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

'माझं बालपण शाखेत गेलं..' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात महेश मांजरेकरांची उपस्थिती, बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा