Vijay Shivtare : शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारेंच्या (Vijay Shivtare) विरोधात अंधेरीत आरपीआयचे (RPI) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विजय शिवताऱ्यांचे पोस्टर घेऊन त्यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं जात आहे. अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात विजय शिवतारे यांनी पदाचा गैरवापर करून जमिनीवरील झोपड्या तोडल्याचा आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळं विजय शिवतारेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

आमदार विजय शिवतारे यांनी गरिबांच्या झोपड्या लॉकडाऊनमध्ये पदाचा गैरवापर करून तोडल्याचा आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मागील अनेक वर्षापासून ही जागा विजय शिवतारे यांच्या ताब्यात आहे. मात्र, बिल्डर विजय शिवतारे यांनी घरे तोडून मोबदला न देता फसवणुक केल्याचा झोपडीधारकांचा आरोप आहे. अंधेरीत विजय शिवतारे हाय हाय, बिल्डर हाय हायच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. आमदार विजय शिवतारे यांनी पदाचा गैरवापर करून गरिबांच्या झोपड्यांवर जेसीबी फिरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

एमआयडीसी पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात 

झोपडीधारक एमआयडीसी पोलीस ठाण्यात आमदार विजय शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत. गरीब झोपडीधारकांना न्याय मिळवण्यासाठी आरपीआयच्या वतीने स्थानिकांसोबत तीव्र आंदोलन केलं आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Vijay Shivtare : कॅपिसिटी असतांना डावललं; माणूस निधन झाल्यावर जसा मातंग होता तसा..; नाराज विजय शिवतारेंची आगपाखड