Rohit Shetty News :  काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शुभम लोनकर व्यतिरिक्त आरजू बिश्नोई हा देखील अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणात आरजू बिश्नोई आणि शुभम लोनकर यांना वाँटेड आरोपी घोषित करण्यात आले आहे.

Continues below advertisement

पैशांची गरज असल्यामुळं मुख्य आरोपी दीपक शर्माने हा गुन्हा करण्यास होकार दिला

मुख्य आरोपी दीपक शर्मा याच्या कुटुंबात 2 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. लहान बहिणीचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. त्या लग्नासाठी घर गहाण ठेवून कर्ज घेण्यात आले होते. दुसरी एक बहीण आजारी असल्यामुळं तिच्या पतीने तिला सोडले असून तिची जबाबदारीही दीपकवर आहे. पैशांची गरज असल्यामुळं दीपकने हा गुन्हा करण्यास होकार दिल्याचे तपासात समोर आले आहे. फायरिंगपूर्वी दीपक घाबरला होता. त्यामुळे त्याने आधी मद्यपान केले आणि त्यानंतर गोळीबार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. फायरिंगसाठी दीपक आणि त्याच्या तीन साथीदारांना एकूण 3 लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यातील 50 हजार रुपयांची पहिली किस्त आधीच देण्यात आली होती. अटक करण्यात आलेला आरोपी सनीचे इंस्टाग्राम अकाउंट तपास यंत्रणांच्या रडारवर आहे.

सुमित कुशवाहालाही सुरुवातीला शुभम लोनकर आणि आरजू बिश्नोई यांनी फायरिंगसाठी संपर्क केल्याची माहिती

सुमित कुशवाहा यालाही सुरुवातीला शुभम लोनकर आणि आरजू बिश्नोई यांनी फायरिंगसाठी संपर्क केल्याची माहिती पोलिसांकडे आहे. मात्र काही कारणास्तव सुमितने हे काम केले नाही. तरीही तो पोलिसांच्या रडारवर असून त्याचे आरोपींशी संबंध असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी घरातच होता

मुंबईतील जुहू परिसरात चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी च्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी घरातच होता. घटनेनंतर जुहू पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. सुदैवाने, गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, प्राथमिक तपासात गोळीबार करणारा एकच व्यक्ती असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी रोहित शेट्टीचा जबाबही नोंदवला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी याच प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं.