एक्स्प्लोर

Rohit Pawar VIDEO : काका, तोपर्यंत शर्टचं बटण असंच ठेवणार, रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, काकींना सर्व मदत करु, पण तुमच्यासाठी लढा सुरुच राहील!

Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा गेला असं रोहित पवार म्हणाले.

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे भावूक झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आपल्या शर्टचं वरचं बटण उघडं असायचं, त्यावर ते बटण लावत जा असं अजित पवार म्हणायचे. पण चाळीस-पन्नास वर्षानंतर कधी दादांची वरती भेट होईल त्यावेळी आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसंच खुलं असेल, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल असं रोहित पवार म्हणाले. तसेच अजितदादांच्या अपघाताला जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही असंही रोहित पवार म्हणाले. 

आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी रोहित पवारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा गेला असं रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्याबद्दल अनेक घटना सांगितल्या. 

Rohit Pawar Vidhansabha Speech :  हेअरस्टाईल अशीच ठेवणार

रोहित पवार म्हणाले की, "एकदा अजितदादा मला म्हणाले होते की, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, त्या कमी कर. दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. अजितदादा नेहमी मला म्हणायचे की, तुझं शारिरीक वजन वाढलंय. शारिरीक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो म्हणायचो. मी अजितदादांना शब्द देतो. माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन. शारिरीक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन."

अजितदादा मला म्हणायचे, वरचं बटण लावत जा. पण एक मात्र मी सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर मी ज्यावेळी अजितदादांना भेटायला जाईन, तोपर्यंत मी माझं बटण असंच उघडं ठेवणार. कारण हे वरचं बटण तुमची मला रोज आठवण देत राहील असं रोहित पवार म्हणाले. 

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : कुणालाही सोडणार नाही

रोहित पवार पुढे म्हणाले की, "एक सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर ज्यावेळी कधी तुमची भेट होईल, तेव्हा हा माझा लढा सुरू आहे त्यामुळे त्यांच्यासमोर मी ताठ मानेने उभा राहीन. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का! या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवलाय. दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही मोठा असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही."

काकी, तुमच्या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या पुतण्याची ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी मी तयार असेन असं आश्वासनही रोहित पवारांनी दिलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
45 हजार हेक्टरवर बोगस केळी विमा, जळगाव जिल्ह्यात खळबळ, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड  
45 हजार हेक्टरवर बोगस केळी विमा, जळगाव जिल्ह्यात खळबळ, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
Rupee Record Low : गॅस दरवाढीनंतर आता 'रुपया'च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
गॅस दरवाढीनंतर आता 'रुपया'च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
Jalgaon Accident: धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
Embed widget