Rohit Pawar on Ajit Pawar plane crash :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात 28 जानेवारीला मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हा अपघात ही घात असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध शंका उपस्थित करत चौकशी करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांची समिती स्थापन करण्यात यावी आणि त्याचं अध्यक्षपद राहुल गांधींकडे देण्यात यावं असे मत देखील रोहित पवारांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.   

Continues below advertisement

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार

अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांची समिती स्थापन करण्यात यावी आणि त्याच अध्यक्षपद राहुल गांधींकडे देण्यात यावं. राहुल गांधींच्या जवळच्या लोकांसोबत याबाबत बोलणं झालं आहे असे रोहित पवार म्हणाले. इंडिया आघाडीने हा मुद्दा लावून धरावा असेही रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. मोठ्या लेवलवर चौकशी व्हावी यासाठी मोठ्या लेवलवर प्रयत्न करावे लागतील असे रोहित पवार म्हणाले. अपघाताबद्दल सर्वांचं मत एकच आहे. पार्थ कालच खासदार बनल्याने त्याला काही बंधनं असतील असे रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी विविध शंका उपस्थित केल्या आहेत

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी विविध शंका उपस्थित केल्या आहेत. हा घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. आहे. कागदपत्र रंगवली जाऊ शकतात जी रंगवली जात आहेत. तसेच, अपघातानंतर ही विमाने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर काढली जात आहेत. हैदराबादला असलेले 'लेगसी 600' हे विमान आता सॅन मारिनो (युएसए) ला ट्रान्सफर करण्यात आले आहे. धंदा सुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालं आहे. जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती असल्याचा आरोप त्यांनी केला. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप