Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : अधिवेशनात अजित पवार यांच्या विमान आपघातची चर्चा व्हावी, यासाठी अनेक दिवसापासून आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत. परंतू अजूनही या मुद्यावर चर्चा करू दिली जात नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मी आत्ता विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेतली आहे. उद्या किंवा सोमवारी या मुद्यावर चर्चा घेतली जाईल, असं ते म्हणाले आहेत, वाट बघूयात असे रोहित पवार म्हणाले.

VSR ला वाचवलं जातंय, याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस

शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी हे सुद्धा अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. पण चर्चा होऊ द्यायची नाही अस दिसत आहे.VSR ला वाचवलं जात आहे, याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

सरकार काय पाऊल उचलते हे बघू नाहीतर ती मोठी माहिती समोर आणू

मोठी माहिती माझ्याकडे आहे. अगदी काही माहिती आम्ही आत्ता समोर आणली आहे. सरकार काय पाऊल उचलते हे बघू नाहीतर ती मोठी माहिती समोर आणू असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. अजित पवार यांच्या सोबत सत्तेत असणारे किती स्मरण पत्र देणार, सत्तेत असून तुम्ही आपल्या माणसाला न्याय देऊ शकत नाही तुम्ही इतरांना काय न्याय देणार? असा सवाल रोहित पवारांनी केला. सुरवातीपासून मी सांगितलं होत, यात काही मी चुकीचा केलं नाही. ED ने मला दोन वेळेस बोलवलं होत. यंत्रणाना सुद्धा दबाव होता. पण आम्ही पक्षासोबत आणि विचारसोबत राहिलो आणि न्यायालयाचे धन्यवाद मानतो. यामध्ये आम्ही काही चुकीचा केलं नव्हतं म्हणून क्लीन चिट दिल्याचे रोहित पवार म्हणाले.

अजित पवार यांचा विमान अपघात 28 जानेवारीला झाला होता

अजित पवार यांचा विमान अपघात 28 जानेवारीला झाला आणि महाराष्ट्राने लोकनेता गमावला. कारण या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 29 जानेवारीला बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राने अजितदादांना अखेरचा निरोप दिला. ही घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. व्हिएसआर कंपनी आणि डीजीसीएच्या अहवालाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.