Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची चारचाकी गाडी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवरुन आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. तसेच बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. नेमकं प्रकरण काय? आणि रोहित पवार काय म्हणालेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही, ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नाही. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील असे रोहित पवार म्हणाले. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती असे ट्वीट रोहित पवारांनी केलं आहे. 

महिन्याभरापूर्वी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली होती. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडलाय. ही गाडी कोणी जाळली? का जाळली याचं उत्तर गृहखातं देणार का? असा सवाल देखील पवारांनी केलाय. 

महत्वाच्या बातम्या:

सरकार दलालीच्या दलदलीत पोखरलंय! लाडकी बहिण योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांचा हल्लाबोल